मनोज जरांगे पाटलांना डिस्चार्ज : कुटुंबीयांचे केले सांत्वन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १२ नोव्हेबर २०२३

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते, त्यानंतर अनेक तरुणांनी या दरम्यान आत्महत्या केल्याचे देखील घडत असतांना मुख्यमंत्री शिंदेंच्या शब्दावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ वाढवून दिला आहे तर आज मनोज जरांगे पाटील यांना 10 दिवसांच्या उपचारानंतर आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डिस्चार्ज दिला जाणार आहे. स्वत: मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डिस्चार्जनंतर आपण आंतरवाली सराटी येथे जाणार असल्याचे असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

कन्नडमधील देवगाव रंगारी येथे चार दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाकरिता संजय सोनवणे यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या घरी शनिवारी रात्री नऊ वाजता मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. डॉक्टरांना काहीही न सांगताच, डॉक्टरांची परवानगी न घेताच आपण तिकडे गेलो, असे मनोज जरांगे म्हणाले. यावेळी ‘आपण काळजी करू नका, मी आपल्या पाठीशी आहे. आपण धीर धरावा व मुलांचे संगोपन करा, आपण जिजाऊंच्या लेकी आहोत हे ध्यानात असू द्या’ असे सांगून मनोज जरांगेंनी कुटुंबाला धीर दिला.

तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो की यापुढे एकानेही आत्महत्या करु नका, असे आवाहनही मनोज जरांगेंनी केले. तसेच, गोरगरीब संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत दिवाळी साजरी करणार नाही, याचा पुनरुच्चार मनोज जरांगेंनी केला. दिवाळीनिमित्त कुटुंबीयांशी संवाद साधला का? यावर मनोज जरांगे म्हणाले, अजून तरी त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. ते दिवाळीत नेमके काय करताय? हेही माहिती नाही. मात्र, मी दिवाळी साजरी करणार नाही म्हटल्यावर तेही दिवाळी साजरी करणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम