वर्धापन दिनापूर्वी ठाकरे गटाला जबर धक्का ; नेत्यांचा ‘जय महाराष्ट्र’ !
दै. बातमीदार । १८ जून २०२३ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाचे अनेक नेत्यासह कार्यकर्त्यांचे अनेक भागात प्रवेश सोहळा सुरु आहे तर उद्या होणाऱ्या वर्धापन दिनासाठी अनेक नेत्यांनी मोठे आयोजन केले असतांना शिवसेनेच्या वर्धापन दिनापुर्वीच ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. उद्या १९ जून, शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे. या आधी ठाकरे गटाच्या शिलेदाराने गटाला रामराम ठोकला आहे.
शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ठाकरे गटाचं उपनेतेपद शिशिर शिंदे यांच्याकडे होतं. या उपनेतेपदाचा राजीनामा शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसं पत्र शिशिर शिंदे यांनी ठाकरेंना लिहिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिशिर शिंदे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा देत शिशिर शिंदे यांनी पत्र लिहिलं आहे. त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं आहे. या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागची सविस्तर भूमिका शिंदे यांनी मांडली आहे. पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत शिशिर शिंदे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. पक्षात घुसमट होत असल्याचं शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे.
शिशिर शिंदे यांचा आधी शिवसेना मग मनसे अन् पुन्हा शिवसेना असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी 2018 ला मनसेला साथ सोडत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेत असताना शिशिर शिंदे हे पक्षाचे नेते होते. 2009 ला भांडुप विधानमतदार संघातून आमदार म्हणूनही ते निवडून आले होते. 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिशिर शिंदे यांनी राज ठाकरे यांची निवड केली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम