मोठा निर्णय : तुरूंगातील कैद्याची होणार सुखी झोप !
दै. बातमीदार । २२ फेब्रुवारी २०२३ । तुरूंगात ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ कैद्यांना आता एक सेवा दिला जाणार आहे. तुरुंगातील कैद्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत तुरुंगात कैद्यांना झोपण्यासाठी ताडपत्री किंवा चादर दिली जात होती. मात्र, आता या परंपरेत बदल करण्यात आला असून, आता कैद्यांना उशी आणि बेड दिला जाणार आहे. या निर्णयानुसार आता तुरूंगातील कैद्यांना उशी आणि बेड वापरण्यास मिळणार आहे. जेल प्रशासनाचे अॅडिशनल डीजी अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली.
अमिताभ गुप्ता यांनी तुरुंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती, या बैठकीत काही कैदी हे विविध आजारांनी त्रस्त असल्याची माहिती देण्यात आली. आजारपणामुळे हे कैदी नीट झोपू शकत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर, ५० वर्षापैक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांना उशी आणि बेड वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय देण्यात आला आहे.
परंतु, ही सर्व साधने कैद्यांना स्व-खर्चाने आणायची आहेत. यासाठी उशी आणि बेडची साईजही निश्चित करण्यात आली आहे. राज्यात तुरूंगात सध्या वायाची पन्नाशी ओलांडलेल्या कैद्यांची संख्या जवळपास ३ ते ४ हजार एवढी आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम