मोठी बातमी : शिंदे गटाला धक्का, न्यायालयाने बजावली नोटीस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ फेब्रुवारी २०२३ । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तूर्त न्यायालयाने दिलासा दिल्याने आता पुन्हा ठाकरे गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देऊन त्यांना ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले आहे.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे निवडणूक आयोगाच्या निर्णय वाचून दाखवत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे आणावा अशी मागणी ठाकरे गटाने केली. शिवसेनेची घटना ऑन रेकॉर्ड असल्याचे सिब्बल म्हणाले. आयोगाने घटना ऑन रेकॉर्ड नसल्याचे म्हटले होते. फक्त आमदार आणि खासदाराच्या संख्येवर आयोगाने निर्णय दिला. सदस्यसंख्या गृहीत धरली नाही.
तर शिंदे गटाचे वकील निरज कौल म्हणाले, सुप्रीम कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करू नये. हे दहाव्या सुचीचे प्रकरण नाही. यावेळी न्यायालयाने आयोगाचा निकाल मागितला. यावेळी कोर्टाने शिंदे गटाला झापले. तुम्ही थेट कोर्टात येऊ शकत नाही. ठाकरे गट आधी हायकोर्टात गेला होता. न्यायालयाने ठाकरे गटाला दिलासा दिला आहे.

तसेच न्यायालयाने शिंदे गट आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात उत्तरे मागवले आहे. याप्रकरणी २ आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. २ आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही. शिंदे गटाचे वकील निरज कौल यांनी याबाब कोर्टात आश्वासन दिले आहे. या काळात शिंगे गटाला व्हिप देखील काढता येणार नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम