
दै. बातमीदार । १६ फेब्रुवारी २०२३ । यंदा लग्न सोहळ्याच्या पूर्वीच सोन्याचे भाव स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस सोन्याने 58,800 चा विक्रमी उच्चांक गाठला. पण आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोने विक्रमी उच्चांकावरून 3,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या आठवड्यात सोन्यामध्ये घसरण दिसून आली.
दोन आठवड्यांपूर्वी 58,800 रुपयांवर असणारे सोने गुरुवारी, 16 फेब्रुवारी रोजी 56,100 च्या पातळीवर आले आहे, म्हणजेच त्याची किंमत 2,700 रुपयांनी खाली आली आहे. जर आपण फ्युचर्स मार्केटच्या दरांवर नजर टाकली, तर आज सुरवातीला गोल्ड फ्युचर (Gold MCX) 45 रुपये म्हणजेच 0.08% च्या किंचित वाढीसह, ते 56,171 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत होते. मागील सत्रात सोने 56,126 वर बंद झाले होते. जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे बुधवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 475 रुपयांनी घसरून 56,345 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 56,820 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही 195 रुपयांनी घसरून 65,925 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
चेन्नई – 57,600 रुपये
दिल्ली – 56,880 रुपये
हैदराबाद – 56,730 रुपये
कोलकत्ता – 56,950 रुपये
लखनऊ – 56,880 रुपये
मुंबई – 56,730 रुपये
पुणे – 56,730 रुपये

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम