सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण ; पहा काय आहे भाव !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ ऑगस्ट २०२३ | देशात मोठ्या प्रमाणात महागाई होत असतांना सराफ बाजारात सोने चांदीच्या भावात आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मे, जून महिन्यानंतर जुलै महिना सोने चांदीच्या भावांसाठी नरमलेला दिसत आहे. यामुळे अनेकानी बाजार पेठेत गर्दी केलेली आहे.

बुधवारी बाजारात MCX नुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,850 रूपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,930 रूपयांनी व्यवहार करत आहे. तर गुड रिटन्सनुसार, बुधवारी सोन्याचे भाव घसरलेले दिसत असून सध्या बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55,100 रुपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,110 रुपयांनी सुरू आहे. त्यामुळे, कालच्या दरानुसार 22 कॅरेट सोन्याच्या भावात 300 तर 24 कॅरेट सोन्याच्या भावात 330 रुपयांचा असा समान फरक पडला आहे. सोन्यात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीमध्ये ही तेजी दिसत असताना बाजारात चांदी देखील नरमलेली दिसत आहे. बाजारात चांदीचे भाव बुधवारी किंचित घसरले आहेत. आज बाजारात चांदी 10 ग्रॅम भावासाठी 773 रुपयांनी विकली जात आहे. तर 100 ग्रॅम भावासाठी चांदी 7,730 रुपयांनी सुरू आहे. मंगळवारी 10 ग्रॅम चांदी 780 रुपयांनी विकली जात होती.

पुणे- 55,100 रुपये
मुंबई – 55,100 रुपये
नागपूर – 55,100 रूपये
पुणे- 60,110 रूपये
मुंबई – 60,110 रूपये
नागपूर – 60,110 रुपये

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम