बातमीदार | २ ऑगस्ट २०२३ | राज्यात गेल्या काही वर्षापासून आपल्या डान्सने बालकापासून ते वृद्धापर्यत थिरकायला लावणारी ‘सबसे कातील, गौतमी पाटील’ हे वाक्य आज देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चर्चेत आहे. नृत्यांगना असलेली गौतमी पाटील ही नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होत असते. सर्व वयोगटातील चाहते गौतमी पाटीलला पाहण्यासाठी आवर्जून कार्यक्रमांना जात असतात. मात्र, अशातच एका कार्यक्रमानंतर, यापुढे डान्स शो करणार नाही, असा इशाराच गौतमी पाटील हिने दिला आहे.
गौतमी पाटीलचा शो अहमदनगरच्या नवनागापूर येथे झाला. यावेळी नेहमीप्रमाणे तिच्या शोमध्ये तरुणांची तुफान गर्दी झाली होती. अगदी लहान मुलांपासून महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वच या कार्यक्रमात आले होते. नवनागापूरच्या सरपंचाच्या नातीचा वाढदिवस होता. यावेळी नातीचा वाढदिसानिमित्त गौतमीला बोलावण्यात आले होते. तिचा डान्स सुरु असतांनाच कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ सुरु केला. तर काहींनी किरकोळ दगडफेक केली.
कार्यक्रमात दगड लागल्यामुळे एक महिला जखमी झाली, असे सांगितले जात आहे. काही मुलांनी कार्यक्रमात गोंधळ घातल्याने एमआयडीसी पोलीस आणि खासगी बाऊन्सर्स यांनी लगेचच वातावरण शांत केले. मात्र त्यानंतर डान्स शो पुन्हा सुरु करण्यात आला नाही. गौतमी पाटीलचा शो तिथेच बंद करण्यात आला. गोंधळामुळे कार्यक्रम रद्द झाल्यानंतर गौतमी पाटीलं तिची प्रतिक्रिया दिली. खूप दिवसांनी माझा कार्यक्रम झाला. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांची खुप गर्दी असते. त्यामुळे मागच्या प्रेक्षकांना डान्स दिसत नाही. त्यामुळे थोडा गोंधळ झाला. कार्यक्रम छान झाला मात्र गोंधळामुळे मी कार्यक्रम लगेच बंद केले. मी प्रत्येक आयोजकाला चांगल्याप्रकारे आयोजन करा. कार्यक्रमात बंदोबस्त व्यवस्थित प्रकारे करा. ज्यामुळे असा गोंधळ मारफेक होणार नाही. जर कार्यक्रमात असाच गोंधळ होत असेल तर मी यापुढे कार्यक्रम करणार नाही. कार्यक्रम करणे बंद करेल. जर कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थित नसेल तर गौतमी यापुढे तिचे डान्स शो करणार नाही, असा थेट इशारा गौतमी पाटीलने दिला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम