
सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण !
दै. बातमीदार । २५ एप्रिल २०२३ । अक्षय तृतीयेच्या एक आठवड्यापूर्वी सोन्यातील तेजीचे सत्र हरवले. चांदीतही मोठी घसरण झाली. पण अनेक तज्ज्ञांच्या मते, देशातील बाजारपेठेत सोने आणि चांदीला हवी तशी मागणी आली नाही. सोन्याचे भाव धपकन आपटले नसले तरी त्यात मोठी घसरण झाली हे मात्र नक्की. ऐन वाढलेल्या किंमतींचा हा परिणाम आहे. गेल्या सहा महिन्यात सोन्यात जवळपास 11 हजारांची वाढ झाली तर चांदीच्या किंमतीही झरझर वधारल्या. 2 फेब्रुवारी 2023 आणि 5 एप्रिल 2023 रोजी सोने-चांदीने किंमतींच्या भाऊगर्दीत नवीन रेकॉर्ड गाठला. दोन्ही दिवशी या दोन्ही धातूंनी भविष्यातील आगेकूच अधोरेखित केली. पण गेल्या दहा दिवसांपासून किंमतीत मोठी वाढ झालेली नाही, हाच ग्राहकांना सध्याचा दिलासा आहे.
हजार रुपयांची तफावत
गेल्या आठवड्यात 14 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने 56,800 रुपये प्रति तोळा विक्री झाले. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,000 रुपयांना अगदी 50 रुपये कमी होता. मध्यंतरीच्या दहा दिवसांत सोन्याला 19 एप्रिल रोजी 200 रुपयांची चढाई करता आली. इतर दिवशी सोन्याच्या किंमतीत पडझड सुरु होती. 25 एप्रिल रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 55,840 रुपये तर 60,850 रुपये प्रति तोळा होता. एका आठवड्यात भावात एक हजारांची घसरण झाली.
गुडरिटर्न्सनुसार, 25 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 90 रुपयांची दरवाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,840 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 10 रुपयांनी घसरुन 60,850 रुपये प्रति तोळ्यावर आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम