राज्यात कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ एप्रिल २०२३ ।  राज्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ होत असतांना दिसत आहे. आज महाराष्ट्रात १ हजार ८६ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या चोवीस तासांत 274 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. याचदरम्यान मुंबईत 216 रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्यामुळं मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या आता एक हजार 635 वर पोहोचली आहे.

दिल्लीतील रुग्णसंख्येत मोठी वाढ
गुरुवारी राजधानी दिल्लीत कोरोनाचे 1527 नवीन रुग्ण आढळले. याशिवाय दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये ही माहिती समोर आली आहे. नवीन प्रकरणांसह, दिल्लीत कोरोनाचे सक्रिय रुग्ण 3962 वर पोहोचले आहेत, तर रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर 27.77 टक्के वर गेला आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 909 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

गेल्या पाच दिवसातील देशातील कोरोनाची रुग्णसंख्या
9 एप्रिल 5,357
10 एप्रिल 5,880
11 एप्रिल 5,676
12 एप्रिल 7,830
13 एप्रिल 10,158

गेल्या पाच दिवसातील राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या
9 एप्रिल 788
10 एप्रिल 328
11 एप्रिल 919
12 एप्रिल 1,115
13 एप्रिल 1,086

कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांनी केलेलं आवाहन

– कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे, अशात बूस्टर डोस ज्यांनी घेतले नसतील अशांनी बूस्टर डोज घेतले पाहिजे.

– लस घेतली असेल तरीही तुम्हाला कोव्हिड होऊ शकतो. मात्र आजाराची तीव्रता कमी होताना बघायला मिळते. सहव्याधी असलेल्या रुग्णांना अधिक धोका असतो. अशात त्यांनी बूस्टर डोस घेतला पाहिजे.

– रुग्णालयात जात असाल तर मास्क घालावा. ज्या लोकांना सर्दी, खोकला, ताप आहे अशांनी मास्क घातला पाहिजे. बंदिस्त ठिकाणी जात असाल तर मास्क घालावा.

देशात सर्वत्र कोरोनाच्या लढाईसाठी सज्ज राहण्यासाठी मॉकड्रिल पार पडताना बघायला मिळाले. मात्र, अद्यापही रुग्णालयात भर्ती होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे आणि ती कमीच राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला साथीच्या महामारीत मास्क सर्वत्र बंधनकारक करण्यात आलं होतं. त्यानंतर जशी जशी रुग्णसंख्या कमी झाली तसे नियमात बदल होत गेले. त्यानंतर चेहऱ्यावरील मास्क देखील निघालेत. मात्र कोरोनावरील औषध अद्यापही बाजारात आलेलं नाही. त्यामुळे कोव्हिडच्या लढाईत मास्क हे देखील एक व्हॅक्सिन आहे. अशात रुग्णसंख्या आटोक्यात ठेवायची असेल तर मास्कदेखील लावला पाहिजे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम