
दै. बातमीदार । १७ सप्टेंबर २०२२ ।हैदराबाद येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी गडबड झाल्याची माहिती समोर आल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) च्या एका कार्यकर्त्याने शहांच्या ताफ्यासमोरच त्याची गाडी आडवी लावली असता, पोलिसांनी सदर गाडी बाजूला हटवली.
मिळालेल्या माहितीनुसार जी. श्रीनिवास या टीआरएस कार्यकर्त्याने त्याची गाडी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्यासमोरच आडवी लावली. याबाबत श्रीनिवास यांनी मी निघून जात असतानाही हे प्रकरण जाणीवपूर्वक वाढवले गेले”, असा आरोप केला आहे.
केंद्र सरकारकडून आज (दि.१७) रोजी ‘हैदराबाद मुक्ती दिना’ निमित्त सिकंदराबादमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे असून या कार्यक्रमानिमित्त हैदराबाद दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे.
दरम्यान, या प्रकरणी अमित शहा यांनी “श्रीनिवास यांनी ताफ्यासमोर त्यांची गाडी पार्क करताच आपली कार अचानक थांबली, यामुळे मी तणावात होतो, तरी आपण या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत” असे म्हटले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम