मोठी बातमी : बांगलादेशात भरलेली बस पडली तलावात !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२३ ।  जगभरातील अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणात सुरु असून नुकतेच बांगलादेशात बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात प्रवाशांनी भरलेली बस तलावात पडल्याने तीन मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला.

या अपघातात बचावलेल्यांनी बस चालकाला दोषी ठरवत बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले. डेली स्टारच्या मते, 52 लोकांची क्षमता असलेल्या बसमध्ये 60 हून अधिक लोक होते. पिरोजपूर येथील भंडारिया येथून सकाळी 9 वाजता निघालेली बस बारिशाल-खुलना महामार्गावरील छत्रकांडा येथे सकाळी 10 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात पडली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बारिशालचे विभागीय आयुक्त एमडी शौकत अली यांनी सांगितले की, अपघातात 17 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील बहुतेक बळी पिरोजपूरच्या भंडारिया उपजिल्हा आणि झलकाठीच्या राजापूर भागातील रहिवासी आहेत. देशात बसचे अपघात होणे नवीन नसून रोड सेफ्टी फाउंडेशन (RSF) च्या मते, एकट्या जून महिन्यात एकूण 559 रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये 562 लोकांचा मृत्यू झाला आणि 812 लोक जखमी झाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम