अर्थमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला भरघोस निधी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२३ ।  राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार हे अर्थमंत्री असल्याने ते पक्षातील आमदारांना मोठा निधी देतात अशी ओरड करून शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार बाहेर पडले त्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली पण वर्षभरात पुन्हा अजित पवार शिंदे व फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात येवून अर्थखाते स्वीकारले आहे. आता तर त्यांनी त्यांच्या आमदारांना मोठा निधी देखील दिला असल्याने शिंदे गट नाराज आहे.

अजित पवारांच्या प्रत्येक आमदाराला विकासकामांसाठी भरभरुन निधी मिळाला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांना विकासकामांसाठी तब्बल 25 कोटीहुन अधिक निधी दिला आहे. अर्थ खात्याची सूत्रे अजित पवारांच्या हाती येताच आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीचा वर्षाव करण्यात आला आहे. या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रत्येकी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे. विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अजित पवारांना साथ देण्याच्या निर्णयामुळे आपल्या मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे आमदार सरोज अहिरे यांनी समाजमाध्यमातून जाहीर केलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम