शिवसेनेच्या चिन्हाबाबत मोठी बातमी : सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० फेब्रुवारी २०२३ । राज्यातील राजकीय वाद सुरु असतांना शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हासाठी शिवसेनेनं आता न्यायालयीन लढ्याला सुरुवात केली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाल्यामुळे ठाकरे गटाला यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आजच सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाबाबत तातडीचा ​​उल्लेख केला आहे. उद्याच्या यादीत उल्लेख करा, डावे, उजवे, काळे आणि पांढरे प्रत्येकासाठी समान नियम लागू होतील, असं म्हणत सरन्यायाधीशांनी मंगळवारी सुनावणी केली जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान, शिंदे गटाकडून आता शिवसेनेची कार्यालय ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटाच्या आमदारांनी ताब्यात घेतले आहे. तसंच, शिवालयाचा ही शिंदे गट ताबा घेणार आहे. शिवसेना शिंदे गटातील आमदार शिवालयात जाणार आहे. विधिमंडळातील बैठक झाल्यावर ताबा घेणार आहे. शिवालय हे पक्षाचे शासकीय कार्यालय आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर हे कार्यालय देखील आमचे असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे. एकनाथ शिंदे कुणाची घेणार जागा? पक्षाचे नाव व चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड होणार आहे.

तसंच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी ठरवण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. नवी राष्ट्रीय कार्यकारिणीही लवकरच जाहीर केली जाणार आहे. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी मुंबईत होणार आहे. या कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांची प्रमुखपदी निवड केली जाणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम