एअरटेलचा जबरदस्त ऑफर ; एक रिचार्ज चार सदस्य वापरणार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० फेब्रुवारी २०२३ । देशात अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी अनेक जबरदस्त प्लॅन ऑफर आणून आपल्या कंपनीचे जास्तीत जास्त ग्राहक जॉईन करण्यात अग्रेसर आहेत. त्यातच ग्राहकांना कमी किंमतींत अनेक आहेत. आज आपण एअरटेलच्या अशा एका रिचार्ज प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. ज्याअंतर्गत एकाच कुटुंबातील 4 लोकांना 1 रिचार्जद्वारे फायदा मिळू शकेल.

Airtel कडे एकापेक्षा जास्त प्लॅन आहेत ज्यामध्ये ग्राहकांना अनेक फायदे उपलब्ध आहेत. या कंपनीकडून ग्राहकांना कमी किंमतींत अनेक स्वस्त प्लॅन्सच्या ऑफर दिल्या जात आहेत. Airtel च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगितले जात आहे ज्यामध्ये 1 रिचार्जमुळे कुटुंबातील 4 सदस्यांना फायदा होतो म्हणजेच एका रिचार्जने 4 मोबाईल चालवू शकता.

Airtel च्या फॅमिली प्लॅन अंतर्गत, एका रिचार्जमध्ये मल्टी युझर्सचा पर्याय मिळेल. कंपनीकडे असे 3 प्लॅन्स उपलब्ध आहेत. यातील सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 GB डेटा दिला जाईल. तसेच या प्लॅनमध्ये 4 युझर्सना आपले सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवता येईल. यामध्ये, एका मुख्य कनेक्शनसहीत 3 अतिरिक्त कनेक्शनचा पर्याय देखील उपलब्ध असेल. या संपूर्ण प्लॅनमध्ये मुख्य युझर्ससाठी 100 GB डेटा मिळेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम