मोठी बातमी : ठाकरे गटाला मोठा धक्का ; महिला नेत्यावर गुन्हा दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ ऑगस्ट २०२३ | राज्यातील भाजपसोबत एकनाथ शिंदे यांचा एक गट येवून सत्ता स्थापन झाल्यावर शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर ठाकरे गटावर मोठे आरोप सुरु झाले होते. त्याप्रकरणी आता ठाकरे गटाच्या दिग्गज महिला नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीसमोर आली आहे.

काय आहे प्रकरण ?
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जगभर पसरलेला आजार राज्यात देखील पसरू लागल्याने या आजाराने थैमान माजविले होते. यावेळी मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलिस ठाण्यात किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकरांसह महापालिकेच्या इतर 2 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप आहे.

कोरोना काळात मुंबई महापालिकेने काढलेल्या काही टेंडरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला. त्यात किशोरी पेडणेकर यांचा हात आहे, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, या प्रकरणी मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग 2 हजारांऐवजी 6800 रुपयांना खरेदी करण्यात आली होती. या कालावधीत मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर होत्या. वादग्रस्त कंत्राट त्यांच्याच इशाऱ्यानुसार देण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणी तपास संस्थेने गत 21 जून रोजी राज्यभरात छापेमारी केली होती. त्यात 68 लाख 65 हजार रुपयांची रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. याशिवाय 15 कोटींची एफडी व अन्य गुंतवणूकही या प्रकरणी हाती लागली होती. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण व सुजीत पाटकर यांच्यासह 10 ते 15 जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम