मोठी बातमी : भाजप आमदाराच्या गाडीचा अपघात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ एप्रिल २०२३ । राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या आमदाराच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात सातारा जिल्ह्यातील भाजपचे आमदार असलेले गोरे यांचा झाला आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला गोंदवले बुद्रुक येथील चौकात अपघात झाला. अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालंय. या गाडीत आमदार गोरेंचे कार्यकर्ते होते.

इफ्तार पार्टीसाठी  आमदार गोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह म्हसवड इथं निघाले होते. त्यांच्या पाठीमागे असलेल्या दुसऱ्या गाडीतून (एमएच ११ सीझेड १००) कार्यकर्तेही म्हसवडकडे निघाले होते. रात्री आठच्या सुमारास या गाड्यांचा ताफा गोंदवले बुद्रुक येथील मुख्य चौकात आला. त्या वेळी नेहमीप्रमाणे चौकात वाहतूक कोंडी झालेली होती.

या कोंडीतून मार्ग काढून आमदार गोरे पुढे मार्गस्थ झाले; परंतु त्यांच्या गाडीला लागूनच असलेल्या दुसऱ्या गाडीला मात्र, मुंबईकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सनं जोरदार धडक दिली. गर्दीत समोरासमोर आलेल्या वाहनांमुळं रस्ता रिकामा करण्यासाठी ट्रॅव्हल्स मागे घेताना गोरेंच्या गाडीच्या पुढील दारावर जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती, की गोरेंचे वाहन काही फूट ढकलत गेलं. या अपघातात वाहनाचं नुकसान झालं असलं, तरी मोठा अनर्थ मात्र टळला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम