अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव वाढले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ एप्रिल २०२३ ।  हिंदू धर्मात महत्वाचा मानला जाणारा सण म्हणजे अक्षय्य तृतीया मानला जातो यादिवशी अनेक लोक सोन्याची खरेदी करीत असता पण याच सणाला मात्र सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहक चांगलेच वैतागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.

शुक्रवारी सोन्याच्या दरात उच्चांकी पाहायला मिळाली. त्यामुळे सोन्याच्या दरातील तेजी अपेक्षित आहे. आज सुद्धा सोन्याच्या दरात 600 रुपयांची तेजी दिसून येत आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,800 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 796 रूपये आहे.

चेन्नई – 62,500 रुपये
दिल्ली – 61,950 रुपये
हैदराबाद – 61,800 रुपये
कोलकत्ता – 61,800 रुपये
लखनऊ – 61,950 रुपये
मुंबई – 61,800 रुपये
नागपूर – 61,800 रुपये
पुणे – 61,800 रुपये

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम