मोठी बातमी : मध्यरात्री आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ नोव्हेबर २०२३

राज्यात गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही नेत्यांवर गुन्हे दाखल झाले असून आता पुन्हा एकदा युवानेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोवर परळ येथील डिलाई रोड ब्रिज लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात ही तक्रार मुंबई महापालिकेने दाखल केली आहे. एन. एम. जोशी पोलिस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रस्ते डिपार्टमेंटकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. रात्री उशिरा आदित्य ठाकरेंच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंकडून डिलाई ब्रिज रोडच्या दुसऱ्या लेनचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले होते. या प्रकरणात बेकायदेशीर आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने तक्रार दाखल केली आहे. यामध्ये शुक्रवारी रात्री त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरीक्त सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या विरोधातही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 16 रोजी रात्री 9.30 वाजता सुमारास वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषद आमदार सुनील शिंदे, विधानपरिषद आमदार सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह 15 ते 20 अनोळखी कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर जमाव जमूऊन त्यांनी महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई यांचे पूर्वपरवानगी शिवाय काम अपूर्ण असलेल्या लोअर परेल ब्रिजच्या सुरुवातीला एसीक भवन समोर लावलेले बॅरिगेट काढून ब्रिजवर अतिक्रमण करून ते त्यांचे सहकारी व कार्यकर्ते समवेत ब्रिजचे मध्यापर्यंत पायी चालत जाऊन त्यांनी वाहतुकीस तयार नसलेला दक्षिण वाहिनी पूल हा वाहतुकीस अनधिकृत रीत्या खुला केल्याने ब्रिजवरून वाहतूक सुरू झाली त्यावरून काही वाहन जाऊन वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केले म्हणून माझी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे. ही तक्रार पुरुषोत्तम प्रल्हाद इंगळे यांनी दाखल केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम