जनतेला मोठा दिलासा : सिलिंडरच्या किमती झाल्या कमी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ नोव्हेबर २०२३

देशभरात गेल्या काही महिन्यापासून महागाईचा जोर वाढत असतांना त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती खूप वाढल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक इंधनाला दुसरा पर्याय शोधत आहेत. अशातच आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. चार प्रमुख शहरातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन किंमती कालपासून लागू झाल्या आहेत. सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची कपात केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून 1 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 101.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार शहरांमध्ये किमती कमी केल्या आहेत. नवीन किंमतींनुसार, 19-kg व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत नवी दिल्लीमध्ये 1,775.5 रुपये, कोलकात्यामध्ये 1,885.5 रुपये, मुंबईमध्ये 1,728 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,942 रुपये इतकी असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून 200 रुपयांची सबसिडी देण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत 903 रुपये, कोलकत्तामध्ये 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईत हा भाव 918.50 रुपये इतका होता. महत्त्वाचे म्हणजे फक्त व्यावसायिक एलपीजीच्या किंमती कमी झाल्या आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलल्या नाहीत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती जैसे थे आहेत. सरकारच्या निर्णयामुळे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतील कपातीमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स व्यवसायांवरील भार कमी होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम