मोठी बातमी : आ.आव्हाड यांच्यासह सात कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ फेब्रुवारी २०२३ । नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत असलेले राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड हे मात्र आता जरा वेगळ्या प्रकरणात अडकले असून त्याच्यावर गुन्हा दाखल हि करण्यात आला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावायाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणात आरोप करत जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेतील अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात नौपाडा पोलिसांनी भांदंवी कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (ब), या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. नगरपालिका अधिनियम 3/25, 4/25 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याबाबतचा उल्लेख आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर आव्हाड यांच्या समर्थकांनी महेश आहेर या अधिकाऱ्याला मारहाण केली. या क्लिपबाबत जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला होता. त्यांनी माध्यमांशीही यासंदर्भात संवाद साधला होता. बुधवारी सायंकाळी 6 वाजून 45 मिनीटांनी जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर यांच्यासह आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेच्या गेटवर हा हल्ला केला. ठाणे मनपामध्ये अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले महेश आहेर हे कामकाज संपल्यानंतर घरी निघाले होते. त्याच वेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम