
दै. बातमीदार । १६ फेब्रुवारी २०२३ । अनेक लोकांच्या डोक्यावर केस गळती होत टक्कल पडलेलं असेल तर कुणालाही आवडत नाही. अनेकांना डोक्यावर केसं नसल्याची लाज वाटते. केसं असली तर तुमची पर्सनॅलिटी दिसून येते. अनेकांना लहान वयात टक्कल पडतं. पण जुनी केस परत येऊ शकतात. त्यासाठी कोणतेही रासायनिक औषध वापरण्याची गरज नाही.
प्रदूषण, धूळ, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, खराब जीवनशैली, रासायनिक पदार्थांचा अतिवापर, ताणतणाव इत्यादी केस गळण्याचे प्रमुख कारण असू शकतात. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. तणाव, शरीरातील हार्मोनल बदल, काही आजार, योग्य काळजी न घेणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमची केसं मऊ होतात आणि पातळ होतात.
स्कॅल्पला मसाज करा –
स्कॅल्पला मसाज केल्यानं रक्ताचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे केसांची वाढ होते. अशा परिस्थितीत केसांच्या चांगल्या तेलाच्या मदतीनं केस हलके करणं आवश्यक आहे.
खोबरेल तेलाचा वापर करा-
खोबरेल तेलामुशे टाळूचा मायक्रोबायोटा सुधारतं, ज्यामुळे केसांचे कूप आणि टाळू मजबूत होतात. वास्तविक तेलामध्ये महत्वाचं फॅटी ऍसिड असतात जे केसांच्या शाफ्टमध्ये प्रवेश करतात आणि केस गळणं कमी करतात.
आवळ्याचा वापर करा
आवळ्यामध्ये आवश्यक फॅटी ऍसिड असतात, जे केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी काम करतात. त्यात विटामिन सी असल्याने तुमची केसं पांढरी होत नाहीत.
एरंडेल तेलाचा वापर करा
एरंडेल तेल केसांसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ई आणि अनेक प्रकारची खनिजे आढळतात. त्यामुळे त्याचा फायदा तुमच्या केसांना होतो.
कांद्याचा रस
कांद्याच्या रसामुळे ब्लड सर्कुलेशन चांगलं राहतं. त्यामुळे केसं पटापट वाढतात. अंघोळ करण्याआधी कांद्याच्या रसाचा वापर करावा.
लिंबांचा वापर करा
लिंबू केसांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं आणि त्यामुळे केसांची वाढही वेगाने होते. लिंबू थेट केसांना लावले जात नाही. तेलासह त्याला लावलं गेलं पाहिजे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम