मोठी बातमी : मुख्यमंत्री शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची गुजरातमध्ये भेट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ डिसेंबर २०२२ ।  महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन राज्यातील विरोधकांनी शिंदे सरकारला घेरले होते. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीत अनेक गावांवर दावा केलाय. तर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात अहमदाबादच्या विमानतळावर भेट झाल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या भेटीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तिथे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळालीय. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीत अनेक गावांवर दावा केलाय. विशेष म्हणजे काही गावं स्वत:हून कर्नाटकात जाण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. सीमावादाचा विषय सध्या न्यायप्रविष्ठ आहे. सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी सुरु आहे. असं असताना कर्नाटकच्या मुख्यमनंत्र्यांनी हा वाद पुन्हा उरकून काढलाय. या सगळ्या घडामोडींदरम्यान दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज झालेली प्रत्यक्ष भेट ही महत्त्वाची मानली जातेय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम