मोठी बातमी : मुख्यमंत्री शिंदे व शरद पवार येणार आमने सामने !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ जानेवारी २०२३ । राज्यातील महाविकास आघाडीला सत्तेपासून पाय उतार झाल्यानंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदे आत्तापर्यंत एका व्यासपीठावर आले नव्हते. मात्र आज पुण्यातील कार्यक्रमात शिंदे-पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमात ते एकत्र येणार आहेत.

पुण्याजवळ असलेल्या मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना आणि शेतकऱ्यांना पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही मध्यवर्ती संस्था म्हणून काम करते. वसंतदादा पाटील यांनी ही संस्था सुरू केली होती नंतर त्यांच्याच नावाने ही संस्था करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ऊसाच्या संदर्भात विविध संशोधन, मार्गदर्शन केले जाते. या सभेसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री अतुल सावे यांच्यासह राज्याच्या साखर उद्योगातील अन्य नेते देखील हजेरी लावणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम