मोठी बातमी : कॉंग्रेसच्या नेत्यांनी हिमाचलचा मुख्यमंत्री ठरवला !
दै. बातमीदार । १० डिसेंबर २०२२ । कॉंग्रेसला दिल्लीतील मनपानंतर गुजरातमध्ये दारूण पराभव पत्करावा लागला असला तरी हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने चांगल्या जागा जिंकल्या आहेत. आता काँग्रेसने आपल्या मुख्यमंत्र्यांचं नाव फायनल केलं आहे. सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडने मंजुरी दिली आहे. आज सायंकाळी त्यांच्या नावाची घोषणा होईल.
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६८ जागा आहेत. परवा झालेल्या मतमोजणीनंतर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. काँग्रेसने ४० जागा जिंकल्या. दुसरीकडे भाजपला २५ जागा जिंकता आलेल्या आहेत. तर ३ ठिकाणी इतरांना संधी मिळाली. विशेष म्हणजे हिमाचलमध्ये आपला खातं उघडता आलेलं नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम