वनडेत इशानने रचला इतिहास ; फटकविले द्विशतक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० डिसेंबर २०२२ ।  शेवटच्या वनडेत द्विशतक झळकवत सलामीवीर इशान किशनने बांगलादेशविरुद्ध इतिहास रचला आहे. हा पराक्रम करणारा तो जगातील सातवा आणि भारतातील चौथा फलंदाज ठरला आहे.
इशान किशनने 50 चेंडूत अर्धशतक, 85 चेंडूत शतक, 103 चेंडूत 150 धावा केल्यानंतर या सलामीवीराने 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. इशान 131 चेंडूत 210 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्यांने 23 चौकार आणि 9 षटकार मारले. यापूर्वी माजी दिग्गज सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतके झळकावली आहेत.

इशान किशनने 126 चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 138 चेंडूत द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता, मात्र आता इशान किशनने त्याचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम