मोठी बातमी : दिल्लीपासून उत्तराखंडरपर्यंत भूकंपाचे हादरे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ ऑक्टोबर २०२३

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी भूकंपाच्या धक्क्याने हादरुन गेली. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.2 एवढी होती. ज्याचे केंद्र नेपाळमध्ये होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली, नोएडा आणि आसपासच्या परिसरात आज दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. लखनौ, उत्तराखंड आणि नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले की, दुपारी २.५१ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. या भुकंपात अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. डेहराडून, उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, या प्रकाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये लोक इमारतींमधून बाहेर धावले आणि बाहेर गर्दी दिसून आली. घरातील पंखे, फर्निचर थरथरायला लागले आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, या भूकंपामध्ये जिवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत असून याबाबतची माहिती गोळा केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम