तुम्हाला माहित पडले का ? उर्फीने केला साखरपुडा

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ ऑक्टोबर २०२३

नेहमीच अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद हि पुन्हा एकदा आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री तिच्या कपड्यांमुळे नेहमीच ट्रोल होत असते. नेहमी नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असणाऱ्या उर्फीचे नवीन फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. उर्फी जावेद यावेळी तिच्या फॅशन, लूक किंवा सडेतोड बोलण्याने चर्चेत आलेली नाही. उर्फीच्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये उर्फीचा साखरपुडा झाल्याचे दिसत आहे.

POP Diaries या इंस्टाग्राम पेजने उर्फी जावेदचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये उर्फीच्या बाजूला एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. तसेच या दोघांसमोर हवन होत आहे. POP Diaries यांनी उर्फी जावेदचा साखरपुडा झाल्याचे म्हटले आहे. उर्फीचा साखरपुडा एका प्रसिद्ध व्यक्तीशी झाला असल्याचे POP Diaries यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये मेन्शन केले आहे. उर्फीचा साखरपुडा हिंदू पद्धतीने झाल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. उर्फी जावेदच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. काहींनी उर्फीला तिच्या नवीन नात्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहीजण ही बातमी फेक असल्याचे म्हणत आहेत.

 

‘बिग बॉस ओटीटी’मुळे उर्फी जावेद चर्चेत आली. उर्फीने तिच्या फॅशन सेन्सने लोकांचे लक्ष तिच्याकडे वेधले. तिच्या या फॅशनमुळे सगळ्यांनी तिला ट्रोल केलं. पण उर्फीने तिच्या स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याने सगळ्यांची बोलती बंद केली. उर्फीला तिच्या फॅशनचा योग्य वापर कसा करायचा हे माहीत आहे. दोन दिवसांपूर्वी उर्फीचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. या व्हिडीओमध्ये उर्फीने तिच्या चेहऱ्यावरील जखम खूप सुंदररित्या फ्लॉन्ट केली होती. पापाराझींनी तिच्या या स्किलचे कौतुक केले होते. उर्फी तिच्याशी पंगा घेणाऱ्यांशीच वाईट वागते. उर्फी अनेकदा गरिबांना मदत करताना देखील दिसते. उर्फी फटकळ जरी असली तरी मनाने खूप चांगली आहे. याचा प्रत्यय अनेकदा नेटकऱ्यांना आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम