मोठी बातमी : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर !
दै. बातमीदार । ३० नोव्हेबर २०२२ । ऑगस्ट २०१८ मध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह अनेक नगरसेवक यांना धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. राज्यात गाजलेले घरकुल घोटाळ्याप्रकरणी वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना आज मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तथापि, प्रमुख संशयित सुरेशदादा जैन यांना दिलासा मिळाला नव्हता. माजी सुरेशदादा जैन यांच्या जामिनासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले तरीही त्यांना जामीन मिळालेला नव्हता. २०१९ मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव जैन यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, गुरुवार दि.२९ नोव्हेंबर रोजी सुरेशदादा जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला असल्याचे वृत्त समोर आले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम