मोठी बातमी : वाढीव पेन्शनसाठी दिली मुदतवाढ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जून २०२३ ।  देशातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कर्मचारी पेन्शन योजनेत वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता ११ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. कर्मचारी कंपन्या व विविध संघटनांच्या मागणीनंतर हा निर्णय घेतल्याचे ईपीएफओने म्हटले आहे.

वाढीव पेन्शनसाठी यापूर्वी ३ मार्चपर्यंत मुदत होती. ती दोन वेळा वाढवून २६ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. सुमारे १२ लाख कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शनसाठी अर्ज केला आहे. कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून १२ टक्के रक्कम कापून ईपीएफमध्ये जमा होते. कंपनीच्या १२ टक्के कपातीचा मोठा हिस्सा ईपीएफमध्ये, तर एक हिस्सा ईपीएसमध्ये जातो. १६ नोव्हेंबर १९९५ रोजी ईपीएस-१५ ही योजना लागू झाली. १ सप्टेंबर २०१४ पर्यंत ईपीएसमध्ये योगदानासाठी ५,००० ते ६,५०० रुपयांची मर्यादा होती. ती वाढवून १५ हजार करण्यात आली. ईपीएफओ सदस्यांना आपले पेन्शन योगदान पूर्ण वेतनाच्या ८.३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे त्यांना वाढीव पेन्शनची संधी मिळाली आहे. कर्मचाऱ्यांना यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम