जोरदार पावसाचा कहर ; १६ जणांना गमवावा लागला जीव !
दै. बातमीदार । २७ जून २०२३ । देशात गेल्या महिन्यापासून बदलत्या हवामानामुळे अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा कहर सुरु झाल्याने अनेकांचे नुकसान झाले असून पाच राज्यांमध्ये १६ जणांना आपला जीव गमवावा लागला.
राजस्थानमध्ये वीज पडण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील अयोध्येत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशात मंडी जिल्ह्यात २०० लोक पुरात अडकले आहेत. २५ राज्यांना अलर्ट झारखंड, : उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, ओडिशा पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली आदी राज्यांत मुसळधार पाऊस पडू शकतो.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम