पर्यटकांसाठी मोठी बातमी : जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ ऑक्टोंबर २०२३

देशभरातील अनेक पर्यटक राज्यातील अनेक ऐतिहासिक किल्ल्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात, त्यातील मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पावसाळ्यात शासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात आले होते. ते शनिवार, ३० सप्टेंबरपर्यंत बंद असल्याने पर्यटकांनी व स्थानिक व्यावसायिकांनी नाराजी दर्शवली होती. अखेर पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे रविवारपासून उघडणार, अशी घोषणा केल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, दिघी बंदरावरून पर्यटकांची ने-आण केली जाते. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातून दरवर्षी लाखो पर्यटक ये-जा करत असतात. पर्यटकांना शिडाच्या बोटीमधून प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळत असून जास्तीत जास्त पर्यटक शिडाच्या बोटीत बसणे अधिक पसंत करत असतात. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होत असतो.

पावसाळ्यामध्ये किल्ल्याच्या अवतीभवती पाच ते सहा फूट उंचीची झाडे-झुडपे वाढल्याने सरपटणारे जनावरे असू शकतात. यापासून कोणाला धोका होऊ नये त्याकरिता पुरातत्त्व विभागाने किल्लाचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडले नव्हते. आता संपूर्ण किल्लाची साफसफाई पूर्ण झाली असून रविवारी पर्यटकांसाठी किल्ला खुला होणार आहे. किल्ला पाहण्यासाठी प्रतिव्यक्ती २५ रुपये आकारण्यात येणार आहेत, तर १५ वर्षाच्या आतील मुला-मुलींना फ्री सेवा असणार आहे, अशी प्रतिक्रिया सहाय्यक संवर्धक पुरातत्त्व विभाग अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम