मोठी बातमी ! पाटील नव्हे पवार जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे उमेदवार
दै. बातमीदार | ३ एप्रिल २०२४ । भारतीय जनता पार्टीने जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी नाकारून स्मिता ताई वाघ यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले उन्मेष पाटील यांनी माहाविकास आघाडीच्या ठाकरे गटाशी संपर्क साधून ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांच्या समवेत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी देखील शिव बंधन बांधून हाती मशाल घेतली. सदर प्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगेच माध्यमांशी संवाद साधतांना महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे करण पवार हे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार असल्याची घोषणा केली. या रणनीतीने भाजपपुढे आव्हान निर्माण केले आहे. याप्रसंगी खासदार संजय राऊत आणि उन्मेष पाटील देखील उपस्थित होते.
तसेच नाराज असलेले उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार राहतील अशी चर्चा असतांना पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आणि उन्मेष पाटील यांचे समर्थक करणं पवार यांना उमेदवारी घोषित झाल्याने आता भाजपचा जळगाव जिल्हा बालेकिल्ला असलेल्या जळगाव मतदार संघातून भाजपचे उमेदवार स्मिताताई वाघ यांना तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने हि लढत जोरदार होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी जळगावमधून पाटील यांचे कट्टर समर्थक करण पवार यांना उमेदवारी दिली , तर कल्याणमधून महिला शिवसैनिक वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात रणरागिणी वैशाली दरेकर यांचा जोरदार सामना होणार असल्याचे सामोरे दिसत आहे. त्यामुळे सदर लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर आज पत्रकार परिषद घेतली. सदर प्रसंगी त्यांनी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून कल्याण-डोंबिवलीतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघरमधून भारती कामळी यांना तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी मशालीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने त्यांना तिकीट देण्यात आले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधतांना स्पष्ट केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम