मोठी बातमी : राहुल गांधींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने केली मंजूर !
दै. बातमीदार । १८ जुलै २०२३ । देशातील कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी गेल्या काही महिन्यापासून चांगलेच अडचणीत आले आहेत. गांधी यांनी ‘मोदी आडनाव’ बदनामी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली आहे.
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची 21 जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे. गुजरात कोर्टाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांनी निकाल कायम ठेवला होता. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 21 जुलै रोजी सुनावणी घेण्याचे मंगळवारी मान्य केले. राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. गुजरात न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्या दोषी आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्यास नकार दिला होता. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या प्रकरणाचा उल्लेख करून लवकर सुनावणी घेण्याची मागणी केल्यानंतर भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी गांधींच्या अपीलावर सुनावणीची तारीख निश्चित केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम