सोमय्या व्हिडीओ प्रकरण : कसून चौकशी करतो ; फडणवीस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जुलै २०२३ ।  राज्यात कालपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असतांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात या प्रकरणी चौकशीची मागणी केली. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी देखील हा विषय सभागृहात मांडला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा विषय अतिशय गंभीर आहे. राजकारणात असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे माणसाचे सर्व राजकीय आयुष्य पणाला लागतं. माझ्याकडे तक्रारी द्या मी चौकशी करतो. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल. ती महिला कोण आहे, हे जाहीर करणार नाही. मात्र कुणालाही पाठीशी घालणार नाही. “आम्ही वरिष्ठ स्तरावर चौकशी करणार आहोत. अनिल परब यांनी मांडलेला विषय गंभीर आहे. कोणतही प्रकरण दाबल्या जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून तपास केला जाईल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम