मोठी बातमी : सोनिया गांधी लढविणार राज्यसभेची निवडणूक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जुलै २०२३ ।  देशातील कर्नाटक राज्यात आगामी आठ महिन्यांत राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणुका होणार आहेत. काँग्रेसला यावेळी काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना राज्यातून वरिष्ठ सभागृहात निवडून आणायचे आहे, असे बोलले जात आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक त्या लढवणार नसल्यामुळे, कर्नाटकातून राज्यसभा सदस्य होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोनियांना विनंती केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कर्नाटकातील काँग्रेसचे तीन राज्यसभा सदस्य सय्यद नासिर हुसेन, डॉ. एल. हनुमंतय्या आणि जी. सी. चंद्रशेखर यांचा कार्यकाळ पुढील वर्षी २ एप्रिल रोजी संपणार आहे. १३५ आमदार असलेल्या काँग्रेसला तिन्ही जागा राखण्याची संधी आहे. त्यामुळे काँग्रेसने या तीन जागांसाठी आपले प्रतिनिधी पुन्हा निवडण्याचा निर्णय घेतला आहे. दिवंगत राजीव गांधी विरोधी पक्षनेते असताना १०८९ पासून ते राहिलेले १०, जनपथ निवासस्थान कायम ठेवण्यासाठी सोनिया गांधींना राज्यसभा किंवा लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. त्यामुळे सोनियांसह, उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाथे आणि कर्नाटकचे सय्यद नसीर हुसेन यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सोनियांना कर्नाटकातून राज्यसभा सदस्य होण्याचा सल्ला दिला आहे. नेहरू-गांधी घराण्यातील एकही सदस्य संसदेत नसावा यासाठी भाजपची योजना असल्याने काँग्रेस त्यांना सुरक्षित मार्ग देण्याचा विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी नुकत्याच झालेल्या विरोधी पक्षांच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी सिद्धरामय्या यांच्याशी बंगळुरमध्ये चर्चा केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम