पावसाचा जोर वाढला : जिल्ह्यातील रेल्वेगाड्यांना विलंब !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जुलै २०२३ ।  देशासह राज्यातील अनेक गेल्या दहा दिवसापासून पावसाची संततधार व मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा फटका लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना बसला आहे. विशेष करून उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीकडून येणाऱ्या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत.

निजामुद्दीन-हुबळी एक्स्प्रेस ही आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० तास, लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटलीपुत्र सुपरफास्ट ही निर्धारित वेळेपेक्षा साडेचार तास, न्यू दिल्ली- बंगलोर कर्नाटक एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा सव्वा तीन तास, निजामुद्दीन- वास्को गोवा एक्स्प्रेस साडे चार तास, बनारस-हुबळी एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा तीन तास, वाराणसी- एलटीटी कामायनी दोन तास, याशिवाय एलटीटी- गोरखपूर दीड तास उशिराने धावत आहेत. याशिवाय बहुतांश गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा तास-दीड तासाने उशिराने धावत आहेत. मुसळधार संततधार पावसाचा फटका रेल्वे दळणवळणला बसला आहे. यामुळे विभागातून धावणाऱ्या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत आहे. यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम