मोठी बातमी : भाजप नेते सोमय्या यांचा ‘तो’ व्हिडीओ निघाला खरा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ ।  गेल्या आठवड्यात राज्यातील भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती अनेक विरोधकांनी भाजपला पुरत हैराण करून सोडले होते. त्यावर पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल मॉर्फ नसून खरा असल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी बुधवारी केला. तपास पथकाने सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचे विश्लेषण केले. त्यात तो व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाले. आता पोलिस हा व्हिडिओ लिक करणाऱ्याचा शोध घेत आहेत, असे सूत्रांनी म्हटले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला होता. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या ऐन तोंडावर हा व्हिडिओ लिक झाला होता. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 10 कडे सोपवण्यात आला. गुन्हे शाखेने प्राथमिक आधारावर संबंधित वृत्तवाहिनीशी संपर्क साधून व्हिडिओची मागणी केली. त्यानंतर त्याचे विश्लेषण केले असता हा व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम