मोठी बातमी : राष्ट्रवादीत दोन गट नाहीच ; शरद पवार !
बातमीदार | ८ ऑगस्ट २०२३ | राज्यात अजित पवारांनी राष्ट्रवादीत मोठी फुट पाडत भाजप व शिंदे गटासोबत सत्तास्थापन केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीत फुट नाही अशी माहिती मिळत असल्याने मोठी खळबळ राज्यात माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दाखल केलेल्या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटीसला शरद पवार गटाने उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन गट नाहीत. शरद पवारच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा करणे हे चुकीचे असल्याचे शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे.
अजित पवारांच्या याचिकेतून राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. राष्ट्रवादीत कुठला वाद आहे हे सिद्ध करण्यास अजित पवार प्राथमिकदृष्ट्या सक्षम नाहीत. प्रथम दर्शनी निवडणूक= आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षात आणि अजित पवार गटात वाद असल्याचे सिद्ध केले नाही. १ जुलै २०२३ च्या आधी अजित पवारांनी शरद पवारांविरोधात कुठलीही तक्रार दिली नव्हती. तसेच राष्ट्रवादीच्या कुठल्याही बैठकीत त्यांनी पवारांना विरोध केला नव्हता, असे शरद पवार गटाने या उत्तरात म्हटले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम