राज्यात बाप नावाला कलंक : दोन्ही मुलांना फेकले विहिरीत !
बातमीदार | ८ ऑगस्ट २०२३ | अनेकांचे बाप आपल्या मुलासाठी वाटेल ते करण्याची हिम्मत ठेवत असतात पण काही हैवान बाप मुलासोबत असे काही करतात कि, त्याचा कुठलाही नेम नाही. अशीच एक घटना अहमदनगर येथील कर्जत येथे घडली आहे. एका हैवान बापाने आपल्या दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हि घटना अळसुंदे येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतजवळ असलेल्या अळसुंदे गावात दारूच्या आहारी गेलेल्या पित्याने थेट कौटुंबिक कलहातून पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकून दिल्याने बहीण- भावाचा मृत्यू झाला आहे. पत्नीच्या फिर्यादीवरून पती गोकूळ जयराम क्षीरसागर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे. ऋतुजा गोकुळ क्षीरसागर (वय ८), वेदांत गोकुळ क्षीरसागर या दोघांचे मृतदेह रविवारी दुपारी विहिरीत आढळले होते. मुलांचे केस कापून आणतो. असे सांगून गोकूळ दोन्ही मुलांना सोबत घेऊन गेला. बराच वेळ तो न आल्याने पत्नीने चौकशी केली असता तो गावात दारू पिऊन पडला असल्याचे समजले. त्याला मुलांविषयी विचारले असता त्याने काहीच सांगितले नाही. घरापासून २०० मीटर अंतरावर विहिरीच्या जवळ लोकांची गर्दी दिसली. त्यावेळी काही लोकांनी ऋतुजा आणि वेदांत पाण्यात बुडाले असल्याचे शीतलला सांगितले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम