मोठी बातमी : विमान उडवून देण्याची धमकी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ जानेवारी २०२३ । देशात गेल्या काही दिवसापासून राजकीय व्यक्तीसह इतर काही स्थळावर हल्ले तसेच नुकतीच विमान उडवून देण्याची धमकी दिली आहे. गोव्यात रशियाहून येणाऱ्या विमानाला उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आले आहे.

रशियाहून निघालेल्या विमानात दोन लहान मुलासह २३८ प्रवासी प्रवास करीत असून त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विमान उझबेकिस्तानला वळवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइटमध्ये २ मुले, ७ क्रू मेंबर्ससह एकूण २३८ प्रवासी आहेत. अजूर एअर लाईन्सचं हे विमान रिशियाच्या पेराम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोव्याकडे निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान, वैमानिकाला सुरक्षेसंबंधित अलर्ट जारी करण्यात आला. त्यानंतर आपतकालीन परिस्थितीत विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम