मध्यरात्री उपमुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला !
दै. बातमीदार । २१ जानेवारी २०२३ । राज्यातील ठाकरे व शिंदे सरकारच्या धनुष्यबाणावर काल नुकतीच सुनावणी झाली या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस हे मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांनी ही विशेष भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अजून समजू शकलेले नाही.
त्यामुळे दररोज नवनवीन राजकीय घडामोड घडताना दिसून येत आहेत. दरम्यान शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार यावर काल सुनावणी झाली परंतु पुढची तारीख मिळाल्याने तुर्तास राजकीय वातावरण थंडावले आहे. मात्र शिंदे-फडणवीस यांच्या रात्रीच्या भेटीगाठींबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांची वर्षा या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटी मागचे कारण अस्पष्ट असून पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते.
पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करणार होते. मात्र काही कारणास्तव हा दौरा रद्द झाला आहे. अशातच उपमुख्यमंत्री रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाकडे धनुष्यबान या चिन्हावरून सुनावनी झाली. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असला तरी उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान या विषयावर चर्चा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये निवडणूक आयोगाचा निकाल काय येईल? त्यानंतरच्या निर्णयांबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण चिन्ह कुणाचे? यावर गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांत खल सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी याबाबत तिसरी सुनावणी झाली. पण कुठलाही निर्णय झाला नाही. आता दोन्ही गटांना लेखी म्हणणे सादर करण्यासाठी आयोगाने 10 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी होईल. याबाबतच दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम