मोठी बातमी : अबू आझमी यांना जीवे ठार मारण्याची धमकी !
दै. बातमीदार । २२ जानेवारी २०२३ । राज्यातील समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धमकीबाबत अबू आझमी यांनी सांगितले की, त्यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी अबू आझमी यांच्या स्वीय सहायकाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. व्यक्तीने आधी औरंगजेबाला शिवीगाळ त्यानंतर अबू आझमी यांच्या पीएलाही शिवीगाळ केली. यानंतर अज्ञात व्यक्तीने आमदार आझमी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून आझमी यांच्या पीएने शनिवारी सायंकाळी उशिरा दक्षिण मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आमदार अबू आझमी यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यानुसार, अबू आझमी यांनी औरंगजेबाचे समर्थन केल्याने त्यांना कॉलवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम