कोरोनाची लस आता नाकाद्वारे ; या दिवशी दिली जाणार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जानेवारी २०२३ । जगासह देशभरात कोरोनाने थैमान घातले होते. मात्र कोरोना प्रतिबंधक कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसीमुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आलं. आता भारत बायोटेकने विकसित केलेली नाकाद्वारे देण्यात येणारी पहिली कोविड-19 लस 26 जानेवारीपासून लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरवात करण्यात येणार, असं कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी शनिवारी सांगितले.

भोपाळमधील इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये (आयआयएसएफ) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एला म्हणाल्या की, गुरांचे त्वचेच्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी पुढील महिन्यात स्वदेशी बनावटीची लस लंपी प्रोव्हेक्टिंड लाँच केली जाईल. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमएनआयटी) येथे आयोजित आयआयएसएफच्या ‘फेस टू फेस विथ न्यू फ्रंटियर इन सायन्स’ या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. २६ जानेवारीरोजी प्रजासत्ताक दिनी आमची अनुनासिक लस अधिकृतपणे लाँच केली जाईल, असे कृष्णा एला यांनी सांगितले. तर खासगी लसीकरण केंद्रांसाठी प्रति डोस ८०० रुपये मोजावे लागणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम