मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जानेवारी २०२३ । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येतंय. या कारणास्तव त्यांच्या घराची तसेच कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात लँडलाइन नंबरवर धमकीचे फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे ही धमकी डी गँग अर्थात दाऊदच्या नावाने देण्यात आली आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी सकाळी तीन वेळा गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात धमकीचे फोन आले. त्यामुळे नागपूर पोलीस अलर्ट झाली आहे. सदर कॉल नेमके कुणी केले, यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर चार संपर्क क्रमांक लावण्यात आले आहेत. या नंबर्सवर सकाळपासून तीन वेळा फोन आले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम