मोठी बातमी : मुंबईसह पुण्यात एनआयएची मोठी छापेमारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ ।  महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए छापेमारी सुरु झाली आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी सुरू आहे. NIA ने ISIS च्या संपर्कात असलेल्या नागपाडा रहिवाशाविरुद्ध 28 जून रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी संशय आणखी बळावल्याने एनआयएकडून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंबईतील नागपाडा येथील रहिवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा झाल्यानंतर एनआयएला संशय आला की, आणखी काही जण ISIS च्या संपर्कात आहेत आणि त्यानुसार एनआयएकडून छापे टाकले जात आहेत. एनआयएने पाच ठिकाणी छापेमारी सुरु असून त्यामध्ये मुंबई आणि भिवंडी प्रत्येकी दोन-दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहेत.

मुंबईसह पुण्यात एनआयए (NIA) कडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. नागपाडा येथील नागपाडा पोलीस ठाण्याजवळ छापा टाकण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती, असा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे.

पुण्यात एनआयए (NIA) आणि आयबी (IB) ची छापेमारी सुरु आहे. NIA आणि IB च्या पथकाकडून कोंढव्यात छापे टाकण्यात आले असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे. आज पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये NIA आणि IB पथकाकडून छापेमारी करण्यात आली. जुबेर शेख, वय 39 वर्ष याला चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि आयबी यांनी संयुक्तरित्या छापा मारून ताब्यात घेतलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम