पवारांनी केला निर्धार : आजपासून नव्याने सरू केली लढाई !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ ।  शरद पवारांना आपल्याच पुतण्याने विरोधकांना सोबत घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी या बंडाविरोधात पुन्हा रान उठवण्यासाठी शरद पवार हे बाहेर पडले आहेत. शरद पवार साताऱ्यात पोहोचले असून त्यांनी कराड मधील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतले. या माध्यमातून पुढील लढाईचे रणशिंग शरद पवार फुंकले. शरद पवार यांच्यासोबत कोल्हापूरचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. या ठिकाणी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

त्यानुसार शरद पवार सकाळीच कराडच्या दिशेने रवाना झाले. ते कराडमध्ये दाखल झाले असून ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. तसेच शरद पवार यांच्या उपस्थितीत दलित समाजाच्या मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शरद पवार काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र आणि देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप, या ठिकाणी बोलताना शरद पवार यांनी व्यक्त केला. फोडफोडीच्या भाजपच्या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले. या फोडाफोडीचा काही फायदा होणार नाही. लवकरच आपल्याला लोकांमध्ये जाण्याची संधी मिळेल. आपण लोकांपर्यंत जावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. विरोधातील सर्व सरकार अशाच प्रकारे उलथून टाकण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकशाहीचा अधिकार जतन करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला. आजपासून आपली लढाई सुरू झाल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी सरकारमध्ये सामील होत मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात घडलेल्या घडामोडींवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. महाराष्ट्राच्या जनतेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. जे घडले त्याची मला चिंता नाही. उद्या मी बाहेर पडेल, राज्यात आणि देशात जेवढे जाता येईल, जेवढे फिरता येईल, तेवढा मी लोकांचा संपर्क वाढवणार असल्याचे शरद पवार म्हणाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम