एटीएसची मोठी कारवाई : चरस विकणारा अटकेत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जुलै २०२३ । राज्यातील अनेक शहरात मोठ्या प्रमाणात चरस विक्रीची चर्चा असतांना एटीएस पथकाने छत्रपती संभाजी नगरात मोठी कारवाई केली आहे. मुंबईहून २५० ग्रॅम चरस घेऊन आलेल्या तरुण ड्रग पेडलरला गुरुवारी रात्री जुना मोंढा परिसरातील रविवार बाजारात सापळा रचून अटक केली. मोहंमद अदनान शेख अशरफ (२७, रा. प्लॉट १६, गल्ली ३, गणेश कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनय चित्रपटगृहाजवळ आरोपी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन कंधारे यांना मिळाली होती. त्यावरुन गुरुवारी रात्री ८ वाजता सहायक निरीक्षक राहुल रोडेंनी सापळा रचून अदनानला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे २५० ग्रॅम चरस सापडले. त्याची किंमत ४ लाख ९० हजार रुपये आहे. अदनान हा अनेक मोठ्या पेडलरच्या संपर्कात होता. तोे तरुणांना व्हाॅट्स अॅपवर संपर्क साधायचा. पोलिसांनी त्याचा मोबाइल तपासला असता अनेक व्हाॅट्स अॅप चॅट त्याने डिलिट केल्याचे समोर आले आहे. चरसची खरेदी किंवा विक्री केल्यानंतर तो चॅट डिलिट करत असे. शहरातील टाऊन हॉल, सिटी चौक, जुन्या शहरात चरस विक्री करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम