प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक ; ‘तो’ फोटो दाखवून वृद्धाकडून उकळले लाखो रुपये !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जुलै २०२३ ।  देशासह अनेक राज्यातील काही तरुणासह वृद्धांना नेहमीच सोशल मिडीयावर हनीट्रॅपिंग करीत अडकविण्याचा प्रयत्न नेहमीच होत असतो. तसेच एका धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कथित हनी ट्रॅपिंगसाठी टीव्ही अभिनेत्री आणि तिच्या मित्राला अटक करण्यात आलीय. परावूरमध्ये, एका वृद्ध व्यक्तीने एका टेलिव्हिजन अभिनेत्री आणि तिच्या मित्रावर हनीट्रॅपिंग करून 11 लाख रुपये उकळल्याचा आरोप केला. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.

सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असलेल्या नित्या सासी आणि बिनू (४८) हे या प्रकरणात आरोपी आहेत ज्यांना पोलिसांनी हनी ट्रॅपिंग प्रकरणात अटक केलीय. पट्टम, तिरुवअनंतपुरम येथील ७५ वर्षीय माजी सैनिक आणि केरळ विद्यापीठाच्या माजी कर्मचाऱ्याकडून ११ लाख रुपये उकळल्याच्या आरोपाखाली तिला अटक केली आहे. नित्याने घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने ७५ वर्षीय माजी सैनिकाशी संपर्क साधला. पुढे 24 मे पासून ही घटना घडली. नित्याने घरी जाऊन त्या वृद्धाशी मैत्री केली. तक्रारीनुसार, नित्याने त्याला घरात धमकावले आणि कपडे उतरवण्यास भाग पाडले आणि तिने त्याचे स्पष्ट फोटो काढले. या सर्व प्रकरणात नित्याचा मित्र बिनूसुद्धा हे फोटो काढण्यात सहभागी होता. पुढे मग याच फोटोंचा वापर करून या दोघांनी त्या वृद्धाकडे २५ लाख रुपयांची मागणी केली आणि २५ लाख दिले नाहीत तर हे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली. वारंवार धमक्यांना कंटाळून त्या वृद्धाने त्यांना 11 लाख रुपये दिले. गुन्हेगारांनी आणखी पैशांची मागणी केल्यावर वृद्धाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि 18 जुलै रोजी परावूर पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अभिनेत्री नित्या आणि तिचा मित्र बिनू या दोघांना अटक झालीय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम