बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या विवाहाची मोठी अपडेट !

बातमी शेअर करा...

बातमीदार  | १९ सप्टेंबर २०२३

प्रत्येक अभिनेत्रीच्या विवाहाच्या बातम्या मोठय प्रमाणात व्हायरल होत असतात. अशीच एका अभिनेत्रीच्या विवाहाची मोठी चर्चा रंगू लागली आहे. ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचा विवाह राघव चढ्ढा यांच्या सोबत होत असल्याने सध्या यांच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. पुढील काही दिवसातच परिणीती – राघव एकमेकांशी लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नासंबंधी मोठे अपडेट समोर येत आहेत. अशातच परिणीती चोप्राचं घर लग्नाआधी रोषणाईने उजळून निघालं आहे. याविषयी व्हिडीओ सोशल मिडीयवर चांगलाच व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ताज्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये, परिणीती चोप्राचा मुंबईतील बंगला राघव चड्ढासोबतच्या तिच्या भव्य लग्नापूर्वी उजळून निघताना दिसत आहे. उदयपूरच्या ताज लेक पॅलेस आणि लीला पॅलेस या दोन आलिशान हॉटेल्समध्ये या दोघांचा विवाहसोहळा होत असला तरी, नववधूच्या कुटुंबीयांनी घर सजवल्याने लग्नाआधी घराला शानदार लायटींग केलीय. व्हिडिओंवरून असे दिसते की चोप्रा आणि चड्ढा कुटुंबांनी परिणीती – राघव यांच्या लग्नाच्या उत्सवासाठी सुंदर अशी सोनेरी-थीम असलेली सजावट निवडली आहे.

काहीच दिवसांपूर्वी परिणीती – राघवच्या लग्नाच्या पत्रिका सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली. त्यात लग्न केव्हा, कुठे आणि किती वाजता आहे हे सांगून टाकलं आहे. परिणीती आणि राघव हे येत्या ३० सप्टेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. ते चंदीगडमधील ग्रँड ताज हॉटेलमध्ये लग्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आम्ही चढ्ढा कुटूंबीय आपल्या सर्वांना त्या ग्रँड वेडिंगसाठी निमंत्रित करतो आहोत. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम