पंतप्रधान मोदींनी दिल्या गणेशोस्तवाचा मराठीतून शुभेच्छा !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ सप्टेंबर २०२३ ।  देशासह राज्यात आज गणपती बाप्पांचे मोठ्या जल्लोषात स्वागत होणार आहे. घरोघरी आज बाप्पाचे आगमन व सार्वजनिक गणेश मंडळे आणि राज्यातील गणेश मंदिरांमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. गणरायाचे स्वागत करण्यासाठी सर्व सज्ज झाले आहेत. पंतप्रधान मोदींनीही एक्स (ट्विटर) च्या ध्यमातून सर्व देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मोदींनी या शुभेच्छा मराठीतून दिल्या आहेत.

गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. आजच्या मुहुर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व खासदार नवीन इमारतीमध्ये प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे देशभरात गणेश उत्सवाचा आनंद आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी मराठीतून पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!’ असे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबतच त्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील त्यांचा जुना फोटो देखील पोस्ट केला आहे. या व्यक्तीरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरे आणखी एक ट्विट करत देशातील सर्व नागरिकांना हिंदी मध्ये देखील शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘देशभरातील माझ्या कुटुंबीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. विघ्नहर्ता-विनायकाचा हा उत्सव तुम्हा सर्वांच्या जीवनात सौभाग्य, यश आणि संपन्नता घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया! अशा आशयाच्या शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आहेत.’

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम